Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांच्या प्रेम प्रकरणाला काळ लोटला. एकीकडे,आलियाने रणबीर कपूरसोबत डेटिंगला

सुरुवात केली. तसा सिद्धार्थही सिंगलचा मिंगल झाल्याचं दिसत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. कियारा एम एस धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांत सिंगसोबत झळकली होती. सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. करण जोहरच्या पार्टीमध्ये दोघांची वारंवार भेट होऊ लागली आणि त्यांच्यातील जवळीक वाढली. आलियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थने मैत्री कायम ठेवली होती. मात्र तिने रणबीरसोबत सूत जुळवल्याचं सिद्धार्थच्या पचनी पडलेलं दिसत नाही. कारण हल्ली त्याने आलियाकडे दुर्लक्ष करणं सुरु केल्याचं म्हणतात. कियाराच्या बर्थडे पार्टीमध्ये आलेल्या मोजक्या पाहुण्यांमध्ये सिद्धार्थ होता. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या आहेत. 'स्टुडंट ऑफ द ईयर'मधून आलिया आणि सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमाच्या वेळीच त्यांच्यातील नातं फुललं, बहरलं. अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या वर्षीच त्यांचं ब्रेकअप झालं आहे. यानंतर बॉलिवूडमध्ये आलिया आणि रणबीरच्या प्रेमाची चर्चा रंगू लागली. रणबीर कपूर आणि आलिया भट आगामी 'ब्रह्मास्त्र' सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

from movies https://ift.tt/2v8jBnZ

Bottom Ad [Post Page]