Post Page Advertisement [Top]

मुंबई :'मैंने प्यार किया'फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू सुद्धा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'मर्द को दर्द नहीं होता' सिनेमातून अभिमन्यूची बॉलिवूड एन्ट्री निश्चित झाली आहे. या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. 'मर्द को दर्द नहीं होता'च्या ट्रेलरवरुन सिनेमाच्या कथानकाचा अंदाज बांधता येतो. कुठल्याही शारीरिक वेदना न होणाऱ्या पुरुषाची ही कहाणी असल्याचे दिसते. फूटपाथवरुन चालणाऱ्या अभिमन्यूचे छोटे-मोठे अपघात होतात, त्याच्या कपाळ आणि नाकातून रक्त येते, मात्र तरीही तो बोलत असतो. त्याला कोणत्याच वेदना जाणवत नाहीत, असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे यावेळी फूटपाथवरुन चालताना अभिमन्यू वेदना न होणाऱ्या जन्मजात आजाराबाबत बोलत असतो.

 

राधिका मदान यात अभिमन्यूसोबत सहकलाकार आहे. सिनेमात हे दोघे लहानपणापासनचे मित्र असतात. अभिमन्यूला लहानपणापासून कोणत्याच वेदना होत नाहीत, हे राधिकाने पाहिलेले असते. त्यामुळे त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होते. कोणत्याही शीरिरक वेदना न होण्याचा उपयोग असंवेदनशील वेळी सत्कार्यासाठी होऊ शकतो, असा दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या कथानकातून दिसतो. वसन बाला यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केले आहे, बाला यांनी याआधी लंचबॉक्स आणि रमन राघव या सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. वसन बाला यांचं दिग्दर्शन आणि भाग्यश्रीच्या मुलाचं पदार्पण असा दुहेरी योग असल्याने सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'मर्द को दर्द नहीं होता'चा ट्रेलर 

Book My Show Offers,Coupons

Bottom Ad [Post Page]