Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1मुंबई: सूर्यकांत भांडे पाटील, अनेकांना हे नाव माहित असेल, पण काही जण या नावापासून अनभिज्ञही असतील. लवकरच सूर्यकांत भांडेपाटील यांची कहाणी मोठ्या पडद्यावर पाहियला मिळणार आहे. 120 मुलांच्या अपहरणाची प्रकरणं मोफत सोडवणाऱ्या सूर्यकांत भांडेपाटील यांची कथा 'फादर्स डे' या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

या सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मी सूर्यकांत भांडे पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर शांतनू बागची या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. याशिवाय एअरलिफ्ट, पिंक आणि रेडचे डायलॉग लिहिणारे रितेश शाह यांच्याकडे संवादाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच इम्रान हाश्मी, प्रिया गुप्ता आणि कल्पना उद्यवार हे चित्रपटाचे निर्माते आहेत. "120 मुलांच्या अपहरणाची प्रकरणं मोफत सोडवणारे भारताचे टॉप हेर सूर्यकांत भांडेपाटील यांच्या आयुष्यावरील 'फादर्स डे' या सिनेमाची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे," अशी प्रतिक्रिया इम्रान हाश्मीने ट्विटरवर दिली आहे.

कोण आहेत सूर्यकांत भांडेपाटील?

 

सूर्यकांत भांडेपाटील हे पुण्याच्या शिरवळमधील एक बांधकाम व्यावसायिक. 29 नोव्हेंबर 1999 रोजी त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा संकेत याचं अपहरण झालं होतं. अपहरणकर्ताने खंडणीची मागणी केला.भांडेपाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. महिन्यांमागून महिने सरले, पण संकेत सापडत नव्हता. अखेर सूर्यकांत भांडेपाटील यांनी स्वत: ट्रॅप लावून आठ महिन्यांनी अपहरणकर्त्याला पकडलं. तोपर्यंत उशिर झाला होता. अपहरणकर्त्यानेच संकेतची हत्या केली होती. त्यांच्या घराबाहेर फर्निचरला पॉलिश करणाऱ्या कामगारानेच मुलाचं अपहरण केलं होतं. ही घटना सूर्यकांत भांडेपाटील कुटुंबांसाठी धक्का होता. त्यानंतर त्यांनी अशा घटनांमध्ये लोकांना मदत करायचं ठरवलं. भांडेपाटील यांनी स्पाय संकेत नावाची डिटेक्टिव्ह एजन्सी सुरु केली. या अंतर्गत सूर्यकांत भांडेपाटील अपहरणाच्या घटनांमध्ये आरोपीपर्यंत पोहोचण्यास पोलिस आणि पीडित कुटुंबियांना मदत करतात. विशेष म्हणजे त्यासाठी ते एकही पैसा घेत नाहीत. आजपर्यंत त्यांनी मुलांच्या अपहरणाच्या तब्बल 120 केस सोडवल्या आहेत.

from movies https://ift.tt/2KtKAzq

Bottom Ad [Post Page]