Post Page Advertisement [Top]


मुंबई : 'बाहुबली' चित्रपटाचा प्रिक्वेल लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. यामध्ये माहिष्मतीची साम्राज्ञी राजमाता शिवगामीची कहाणी तुम्हाला पाहायला मिळेल. विशेष म्हणजे हे कथानक मोठ्या पडद्यावर नव्हे, तर 'नेटफ्लिक्स'वर सीरिजच्या माध्यमातून उलगडणार आहे.

'बाहुबली : द बिगिनिंग' (2015) आणि 
'बाहुबली : द कन्क्ल्युजन' (2017) च्या यशानंतर शिवगामीची कथा प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. बाहुबलीच्या दोन्ही भागांनी देशासह जगभरात दणदणीत गल्ला जमवला होता. तेलुगू भाषेतील मूळ चित्रपटाचं मल्ल्याळम, तामिळ आणि हिंदी भाषेत डबिंग झालं. राजामौली दिग्दर्शित चित्रपटातून अमरेंद्र बाहुबली, महेंद्र बाहुबली या दोघांच्या कथा आपण पाहिल्या. आता शिवगामीचा सामान्य तरुणी ते माहिष्मतीची राजमाता असा प्रवास या प्रिक्वेलमधून पाहायला मिळणार आहे. 

राजमाता शिवगामीच्या न्यायप्रियतेचे गोडवे चाहत्यांनी याआधीच गायले आहेत, त्यामुळे तिच्यावर आधारित सीरिज पाहण्यास अनेक जण उत्सुक आहेत. 'बाहुबली : बिफोर द बिगिनिंग' असं याचं नाव असेल. आनंद निलकंठन यांच्या ‘द राइज ऑफ शिवगामी’ या कांदबरीवर ही सिरिज आधारित आहे. 
या शोचे दोन सिझन येणार असून पहिला सिझन 9 भागांचा असेल. शिवगामीच्या भूमिकेत कोण दिसणार, इतर व्यक्तिरेखा कोण साकारणार, वेब सीरिज कधी रिलीज होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

from movies https://ift.tt/2vuycJT

Book My Show Offers,Coupons

Bottom Ad [Post Page]