Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1
https://ift.tt/eA8V8J सिनेमा, नाटकांमध्ये.. गोष्टींमध्ये नेहमी आपल्याला सांगितलं गेलं आहे की माणसाला दोन मनं असतात. एक चांगलं मन आणि एक वाईट मन. म्हणजे ढोबळ अर्थाने चांगले विचार आणि वाईट विचार. या दोन्ही तराजूमध्ये माणूस सतत तोलला जातो. जे पारडं जेव्हा जड, त्या माणसाचं तसं वर्तन. याच दोन स्वभावांना, विचारांना, मनांना एकमेकांसमोर उभं केलं तर काय होईल? साहजिकच दोन भिन्न स्वभावाची मनं आमोरासमोर आली तर त्यात झगडा तयार होईल. हा झगडा पडद्यावर मांडण्याची जबाबदारी संदीप मोदी या नव्या दिग्दर्शकाने घेतली आणि त्याने चुंबक बनवला. विचारांमध्ये असलेली क्लिअॅरिटी, उत्तम कास्टिंग, सर्व तांत्रिक अंगांचं चोख काम यामुळे हा चुंबक आपल्याला येऊन चिकटतो आणि त्याचं चिकटणं आपल्याला हवंहवंसं वाटू लागतं. या सिनेमाला अक्षयकुमारने आपलं नाव दिल्यामुळे या सिनेमाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर त्याने एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीतही स्वानंद किरकिरे यांच्या अभिनयामुळेच आपण या सिनेमाला आपलं नाव दिल्याचं तो सांगतो. सिनेमाच्या ट्रेलरमधून याचा अंदाज येतो. स्वानंद यांचा अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. पण त्यासाठी आधी सिनेमाची गोष्ट समजून ध्यायला हवी.

सोलापूरजवळच्या एका गावात भालचंद्र उर्फ बाळू राहतो. त्याला एसटी स्टॅंडवर ऊसाच्या रसाचं दुकान टाकायचं आहे. त्याच्या मामाने त्याला आपण तुला गाळा घेऊन देऊ असं सांगितलंय. त्यासाठी त्याला काही हजार रुपये जमवायचे आहेत. हातात वेळ अत्यंत कमी आहे. आपला मित्र डिस्कोसोबत तो पैसे कसे जमवावेत यावर विचार करतो आहे. आता काही करुन कमीतकमी वेळात पैसे कमावण्याचा विचार दोघांच्या मनात येतो. बाळूला तसा हा विचार अयोग्य वाटतो, पण परिस्थिती पाहता आता त्यानेही हाच मार्ग स्वीकारायचं ठरवलं आहे. बनावट लाॅटरीचं आमीष दाखवून रक्कम गोळा करण्याचं ठरतं आणि या जाळ्यात सापडतात प्रसन्न ठोंबरे.

प्रसन्न स्वभावाने अत्यंत सरळमार्गी. कुणावरही भाबडेपणाने विश्वास ठेवणारे. प्रसन्न अपंगमती नाहीत. पण काहीसे स्लो लर्नर आहेत. त्यांच्या या स्वभावाचा फायदा घ्यायचं दोघे ठरवतात आणि प्रसन्नकडून रक्कम घेतली जाते. पण त्याचा परिणाम उलटा होतो, प्रसन्न पैसे देतात पण त्यांच्या चांगुलपणा, भाबडेपणा मात्र बाळूला येऊन चिकटतो. एका अत्यंत चांगल्या इसमाला आपण आपल्या स्वार्थासाठी फसवतो आहोत, हा त्याचा अंतर्गत झगडा सुरु होतो आणि डिस्को, बाळू, प्रसन्न यांचा हा त्रिकोण चुंबक या सिनेमाचा ताबा घेतो.

विवेकासोबतचा झगडा या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतो. पण म्हणून हा सिनेमा जड नाही. उलट, प्रसन्नच्या स्वभावासारखा तो सरळ थेट तुमच्याशी बोलू लागतो. त्यात बाळू आणि डिस्को या मुलांना परिस्थितीने मेटाकुटीला आणलं असलं तरी टीनेजमधला आवश्यक इनोसन्स त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सिनेमा हलकाफुलका होतो. खेळता राहतो. प्रसन्नचे साधे सोपे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

कथा, पटकथा आणि संवाद या पातळ्यांवर सिनेमा कसून बांधला गेलाय. या सिनेमातून एक पूर्ण गोष्ट मांडलेली दिसते. पार्श्वसंगीत, छायांकन, संकलन, कलादिग्दर्शन या सर्वच अंगांनी चित्रपट उत्तम बनला आहे, म्हणून तो आपलं रंजन करतो. संदीप मोदी यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. हा सिनेमा रसिकांचं नक्कीच मनोरंजन करेल. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत चार स्टार.

हा चित्रपट आवर्जून थिएटरमध्ये जाऊन पाहायला हवा.

from movies https://ift.tt/2K0ixHt

Bottom Ad [Post Page]