Post Page Advertisement [Top]

नवीन कलाकारांसाठी काही टीपा Drama and Movies Tips for New Artists :
(कृपया हे जरूर आणि पूर्ण वाचावे, ह्याचा आपल्याला फायदाच होणे अपेक्षित आहे)

१. प्रथम दर महिन्यास एक नाटक आणि सिनेमा (भाषेचे बंधन नाही)

२. नाटक आणि सिनेमा पाहताना, रंगमंच आणि कॅमेरा ह्यांचे भान ठेवून कलाकारांचा अभिनय, व्यक्तिरेखा, हावभाव, शब्दफेक, संवादफेक, आवाजाचा चढ-उतार (पोत), हालचाल, प्रतिक्रिया, प्रत्युत्तर, चपळपणा, संयम, दोन वाक्य/शब्द ह्यांच्यावर दिलेला भर, दोन्हीतले अंतर ह्याचे निरीक्षण करावे

३. मराठी मध्ये लोकसत्ता वृत्तपत्राच्या रविवारच्या लोकरंग पुरवणीचे पहिले पानाचे दोन्ही लेख मनातून आणि मुखोद्गत पद्धतीने वाचावे, शब्दाचा, वाक्याचा अर्थ कळत नसल्यास जाणकार व्यक्तीस निःसंकोच विचारावे. हिंदी मध्ये दैनिक भास्कर आणि इंग्रजी मध्ये दी इंडियन एक्सप्रेस चे अंक वाचावेत, दी फ्री प्रेस जनरल ह्या इंग्रजी वृत्तपत्राची लेखन शैली, नवोदित इग्रंजी शिकणाऱ्या लोकांसाठी सोपी असते.

४. प्रवास करताना विविध भाषिक लोकांचे निरीक्षण करावे, त्यांचे कपडे, हावभाव, भाषाशैली, बोलण्याचा ढंग आदी.. त्याचे अनुकरण (imitation) करावे, अंधानुकरण (blind imitation) नव्हे!

५. स्वतःचे रूप आणि स्वतःच्या मर्यादा जाणून घेऊन त्यानुसार आपल्याला कुठले पात्र जमू शकते हे स्वतः अभिप्रेत करावे जेणेकरून मोठे पात्र मिळवण्याकरिता त्यानुरूप बदल स्वतःमध्ये (रूप, भाषा, अभिनय) घडविणे आणि त्यासाठी मेहनत घेणे.
इथे एक लक्षात असावे कि प्रत्येक व्यक्ती मुख्य भूमिका करूच शकेल असे नसते परंतु मुख्य भूमिका साकारणारी व्यक्ती सुद्धा प्रत्येक पात्र साकारू शकते असे नसते!!


६. ऑडिशन (अभिनयाची मुलाखत)
ला जाताना प्रथम स्वतः स्वतःचे कपडे, रूप नेटनेटके आहे की नाही ह्याची खबरदारी घ्यावी, पूर्तता करावी, आणि मगच ऑडिशनच्या ठिकाणी पाऊल (एंटर होणे) टाकावे


७. आपल्याला मिळालेला परिच्छेद (स्क्रिप्ट) आधी मनातून वाचावी, मग तोंडाने वाचावी, काही प्रश्न जसे व्यक्तिरेखा (कॅरॅक्टर) कसे आहे, साधारण वय कसे आहे, कुठला भाव, प्रसंग अभिप्रेत आहे हे तिथल्या व्यक्तीस निःसंकोच विचारावे.

८. स्क्रिप्टचे पठण महत्त्वाचे नसते तर त्यातील भाववाचकता, प्रसंग, विशिष्ट शब्दोच्चार तुम्ही कसे करता, साकारता हे गरजेचे आहे, तथापि विशिष्ट शब्द असल्यास ते तसेच उच्चारावे बाकी काही शब्दांमध्ये बदल केल्यास (अर्थाचा अनर्थ न होऊन देता!) स्क्रिप्ट सादर करावी. इतके बदल नकोत कि दहा वाक्यांची स्क्रिप्ट तुम्ही तीन चार वाक्यांत संपवाल!!

९. एकदा हे झाले की ऑडिशन देताना प्रथम विचारावे कि आधी ओळख (प्रोफाइल) कि आधी सादरीकरण (परफॉर्मन्स) ?

१०. प्रोफाइल देताना पूर्ण नाव, वय, उंची, संपर्क सांगून समोर, उजवीकडे आणि डावीकडे वळून (वळल्यावर प्रत्येक वेळी मान फिरवून कॅमेराकडे पाहून किंचित स्मित होणे) आणि पुन्हा समोर वळणे.

११. ऑडिशन देताना, कॅमेरा हाफ प्रोफाइल आहे की फुल प्रोफाइल आहे हे जाणून घ्यावे

१२. रंगमंच आणि कॅमेरा दोन वेगवेगळी माध्यमे आहेत, गरज नसताना अतितार (ओरडून) स्वरात वाक्ये बोलू नयेत (व्यक्तिरेखा तशी असल्यास आवाजाचा पोत वरचा हवा), देहशैली, हावभाव, हालचाल ह्यावर अंकुश असावा, उगाचच अति नाटकी किंवा अति मूव्हमेंट्स इथे अपेक्षित नसतात!

१३. जिथे ऑडिशन ला जात आहात तिथल्या व्यक्तीशी उत्तम संवाद साधून जमल्यास त्यांचा संपर्क स्वतःकडे सेव करून घ्यावा, उगाच मागे लागू नये.

१४. कलाकारांनी ऍडस (जाहिरातींची) ओपन ऑडिशन्स जरूर द्यावीत कारण क्लायंट ला कुठला चेहरा अभिप्रेत आहे हे निश्चित नसते!

१४. ऑडिशन्स ला जाताना ज्याचे तर्फे आला आहात त्याचा रेफरन्स द्यावा, कॉर्डिनेटर असल्यास त्याचा पाठपुरावा करावा.

१५. काही कास्टिंग कंपन्या मेम्बर्स करून घेतात, तेव्हा ते तितके खरे आहेत का ह्याची खातरजमा करावी, शक्यतो काही माणसे पाच दहा हजार रूपये काम देण्याआधी मागून काम देतो असे बोलतात तिथे कधीच पैसे देऊ नये, कामानंतर कमिशन देण्यात काहीच चुकीचे नाही. काही कंपन्या शुल्लक शुल्क आकारून मेम्बर्स करून तुम्हाला प्रमोट करत असल्यास काही हरकत नाही पण त्याची नोंद असावी.

१६. तुमचे लुक्स (दिसणे), अभिनय क्षमता, तुमचे आचरण (बिहेविअर), तुमचा संवाद (अप्रोच), तुमचे उत्तम संबंध (रिलेशन्स) आणि तुमचे संपर्क (काँटॅक्ट्स) ह्या एकूण गोष्टींवर तुम्हाला काम मिळणे अपेक्षित आहे.

१७. तुम्हाला कुठल्याही गोष्टींविषयी कुठली अडचण, संदेह, शंका, प्रश्न असल्यास ते त्वरित त्या त्या वेळी संबंधित व्यक्तीशी बोलून निराकरण करून घ्यावे.

१८. मुलींसाठी महत्त्वाचे म्हणजे जे अश्चिल नाही असे कुठलेही कपडे घालण्यास, पात्र साकारण्यास ना नसावी, काळानुसार आणि प्रोजेक्ट्स नुसार स्वतःमध्ये बदल करावेत.

१९. अभिनय हा शिकून येत नाही, अर्थात त्यास आकार द्यावा लागतो तथापि तो शिकण्यासाठी भरमसाठ फी भरण्यापेक्षा नाटक पाहावे, करावे, अभिनय, आवाज शिबिरांना भेट द्यावी, वाचन करावे, स्वतःला अपडेट ठेवावे.

२०. स्वतःमध्ये योग्य ते बदल करणे, आत्मविश्वास ठेवणे, खंबीर राहणे, कमी बोलणे, अवाजवी गप्पा न मारणे, स्वतःच्या आचरणामध्ये संयम ठेवणे, प्रसंगाचे भान ठेवावे, आपल्याला जे येत नाही ते शिकून घ्यावे, जे येते तयात अजून उत्तम बनावे. कधीही भिऊ नये, मुलींनीhttps://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/fd4/1.5/16/1f44c.png👌 उगाच घाबरून संकोचून वागू नये, कोणीही आपल्याला डायरेकट् कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, फसवू शकत नाही.
बाकी मित्रहो, नम्रता असावी, आपल्याला जो काम देतो त्याची जाणीव ठेवावी, आदर ठेवावा, जिथे एटीट्युड गरजेचा नाही तिथे तो दाखवू नये कारण समोरचा आपल्याला चुकीचे गृहीत धरू शकतो, प्रोजेक्ट्सला समंती देताना सगळे काही आलबेल आहे का, त्याचा आपल्याला फायदा होणार का हे तपासावे, आणि मग हो म्हणावे!
मराठी कलाकार whatsapp ग्रुप

Bottom Ad [Post Page]