Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1

 


लावणी सम्राज्ञी 

आपल्या बहारदार, अस्सल घरंदाज, ठसकेबाज स्वरांनी लावणी या गीतप्रकारास मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी गायिका सुलोचनाताई चव्हाण यांचं आज वयाच्या 89 वर्षी दुःखद निधन. गेल्या काही दिवसांपपासून त्या आजारी होत्या. वयाच्या 7 वर्षांपासून गायनास प्रारंभ करणाऱ्या सुलोचनाताईंनी कोणतेही शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नव्हते. ग्रामोफोनवर गाणी ऐकून त्या गायला शिकल्या. जवळजवळ 60 वर्षे त्यांनी मराठी संगीतप्रेमींच्या मनावर आणि कानावर अधिराज्य गाजवलं होतं. मराठी शिवाय हिंदी, गुजराती व पंजाबी भाषेतही त्यांनी अनेक गाणी गायली, जाहीर कार्यक्रम सुद्धा सादर केले.आपल्याला मिळणाऱ्या मानधन, बिदागीतून त्यांनी अनेक धार्मिक स्थळे, सामाजिक संस्थांना आर्थिक मदत सुद्धा केली होती. 

आजही त्यांनी गायलेली गाणी ऐकली आणि ऐकवली जातात. शब्दोच्चार स्पष्ट आणि अस्खलित यावे यासाठी त्यांनी त्यांच्या पतीदेवांचे मार्गदर्शन घेतले होते. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांना ' लावणी सम्राज्ञी ' ही उपाधी दिली. आणि तेव्हापासून त्या लावणीसम्राज्ञी सर्वश्रुत झाल्या. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारचा ' लता मंगेशकर पुरस्कार ', ' संगीत नाट्य अकादमी पुरस्कार ', पुणे महानगरपालिकेचा  ' राम कदम पुरस्कार आदी मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. सुलोचनाताईंचे जाणे हे मराठी संगीत व मनोरंजन क्षेत्राचे हे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. सुप्रसिद्ध ढोलकीवादक विजय चव्हाण त्यांचे पुत्र आहेत. सुलोचनाताईंच्या कारकिर्दीतला मानाचा मुजरा, भावपूर्ण श्रद्धांजली, ईश्वर सदगती देवो. 🙏🙏🙏💐💐😔😔

सुलोचनाताईंची काही निवडक गाजलेली गाणी

1) तुझ्या उसाला लागल कोल्हा रं

2) आई मला नेसव शालू नवा

3) कळीदार कपूरी पान

4) मला हो म्हणत्यात लवंगी मिरची

5) कसं पाटील बरं हाय का 

6) पावणा पुण्याचा आला ग

7) पाडाला पिकलाय आंबा 

😎 मला बघून मारतोय डोळा

9) मला हो म्हणत्यात पुण्याची मैना

10) सोळावं वरीस बाई धोक्याचं

Bottom Ad [Post Page]