Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1बुध्दाचा मार्ग सांगणारा...
बाबासाहेबांच्या उत्तुंग कार्याला वाहिलेला...


*'उतरंड' सिनेमा पाहिला का?*


         बंधूंनो, खैरलांजी हत्त्याकांडा सारख्या महाकठीण विषयावर चित्रपट करतांना किती किती अडचणी आल्या म्हणून सांगू? इतक्या कलंदर अडचणी की त्या अडचणींवरच एक नवीन सिनेमा तयार होईल. 

 *मी या सिनेमाच्या निमित्ताने मी यु पी, एम पी, राजस्थान, गुजरात, बिहार जवळपास अर्धा भारत फिरलो  तिथली आपल्या लोकांची हेटाळणी, जातीयवाद जवळून बघितला! सारे विदारक चित्र बघून खूप हैराण झालो अस्वस्थ झालो. देश फिरण्याचे कारण हे की आधी मी हा सिनेमा हिंदी मधून बनवणार होतो!*
    मुख्य अडचण होती ती म्हणजे प्रियंका आणि सुरेखा भोतमांगे यांच्या भूमिकांची.

*या भूमिकेसाठी खूप प्रथित यश नायिका पुढे आल्या. परंतू जसेही मी स्टोरी सांगत असताना जसाही मी त्या माय लेकीच्या नग्न धिंड प्रकरणा पर्यंत पोहोचायचो... ते ऐकून त्यांचे चेहरे केविलवाणे होऊन जायचे सगळी स्टोरी ऐकून अस्वस्थ व्हायचे .. आणि शेवटी उसासा टाकून नकार द्यायचे.*
त्यांची नावे मुद्धाम सांगत नाही कारण उगीच चर्चा नको.

 *अखेर एक युपी ची मुलगी आली ती कथा ऐकून तयार झाली, पण तिला अभिनय येत नव्हता..  जीवतोड मेहनत घेऊन तिला मी अभिनय शिकवला, अग्रीमेंट झाले आणि शूटिंग सुरु झाले....*
 जवळ जवळ अर्ध्याहून अधिक चित्रपटाचे चित्रीकरण झाले. आणि नग्न धिंड काढण्याचा सिन सुरु झाला बाजारात खूप गर्दी जमली..  *आणि सर्व तयारी झालेली असतांना बाई ने सरळ सरळ नकार दिला.. म्हणाली मी नाही करणार हा सीन.. तिला खूप लोकांनी समजावले विनंत्या केल्या पण काही उपयोग झाला नाही आमचे लाखो रुपये बरबाद झाले..*
    
    पुन्हा शोधाशोध सुरु झाली 
*एक दिवशी एका तरुणीचा फोन आला म्हणे मला काम करायचंय सिनेमांत. तिला मी एका रेस्टॉरंट मध्ये बोलावले. म्हणे मी फेशर आहे. काय कराव लागेल म्हटलो आधी acting शिका. पुन्हा बोलली अजून काही.. पुन्हा बोललो आधी acting शिका वाटले तर मी शिकवीन परंतू माझी फी द्यायची लागेल.. तरुणी बोलली पैसे नसतील तर.. म्हटलो जो कुणी मोफत शिकवत असेल त्याच्याकडून शिका कारण शिकल्या शिवाय दुसरा पर्याय नाही मी माझ्या सख्ख्या मुलाला ही घेणार नाही.

* मला नंतर कळले की माझे बोलणे रेकॉर्ड करणे सुरु होते म्हणजे स्टिंग ऑपेरेशन!

 *पण बुद्ध ज्याच्या रग रगात आणि आंबेडकर ज्याच्या नसानसात त्याचे कोण वाकडे करील या जगात!*
दिल्लीला गेलो होतो तेव्हा ऑडिशन घेतली होती. तिथली  एक मुलगी तयार झाली आणि तिच्या काका सोबत शुटिंग साठी नाशिकला आली. मी देखील मुंबईहून नाशिकला सर्व युनिट घेऊन आलो सर्व कलाकार नाशिकला हॉटेलवर जमले.. 

*दुसऱ्या दिवशी शूट सुरु होणार तेव्हढ्यात बाई ने सांगितले कि तिच्या वडिलांना attack आलाय तिला जावे लागेल.. माझी तर हवाच निघून गेली..मग काय तिच्या हातात पैसे ठेवले आणि पाठवून दिले.*
एका मागून एक आघाताने मी पागल होईल कि काय असे वाटू लागले. 

त्यानंतर एका कॉर्डीनेटर ने आपल्या नात्यातली एम पी ची मुलगी आणली. पुन्हा शूट सुरु झाले. 

*ऐन पावसाळ्यात शूटिंग सुरु होते.. त्या गावात एकमेव हॉटेल होते..जेथे आमची 35 लोक थांबलेली होती.. त्यांना कुठून तरी कळले कि आम्ही खैरलांजी घटनेवर फील्म बनवतोय.. मग काय? हॉटेल अर्थातच होतं 96 खुळी लोकांचं. आमच्यासाठी साहजिकच ते हॉटेल बंद झालं !*

       मग गावातल्या समाज मंदिरातच आम्ही कित्येक रात्री काढल्या. पुढे त्याने रेट वाढवून हॉटेल दिले ही वेगळी गोष्ट.

       *एक दिवस शूट सुरु असताना पोलिसांनी माझी गाडीचं उचलून नेली त्यात कॅमेरा कपडे सर्वच होतं. मी पोलीस स्टेशन मध्येच थैमान घातलं.. खूप फोनाफोनी केली. मीडिया मध्ये कळवलं. त्या इन्स्पेक्टर ला बोललो साहेब अन्याया विरुद्ध सिनेमा करतोय आम्ही, आणखी अन्याय करू नका, पण त्याने ऐकले नाही, शेवटी मी जमवा जमव सुरु केली आणि त्याने अखेर फक्त 100 रुपये फाईन घेऊन सोडून दिले. तो पी आय देखील 96 खुळी होता*

    सिनेमा खूपच प्रभावी होणार अशी चिन्हे दिसू लागली कारण प्रत्येक कलावंत जीव ओतून काम करत होता!

 *एक सरदारजी कॅमेरामन होता, साला पक्का बाईलवेडा निघाला. आणि वरून चोरून लपून पाच पाच मिनिटाला सिगारेट फुकायला जायचा. आमच्या युनिट मध्ये मला कुणी सिगारेट ओढणारे किंवा दारू पिनारे अथवा मुलींशी गैर वागणूक करणारे चालत नव्हते. मी सरळ हाकलून दयायचो. फालतूगिरी मी कधीचं खपवून घेतली नाही.* 

    एकदा माझी स्टोरी ऐकून बी आर पारेख नावाचा प्रोड्युसर दीड  कोटी रुपये घेऊन आला. तो दारू प्यायचा गप्पा मारायचा मुलीन बद्दल जरा जास्तचं. मी नुसताच limca प्यायचो 

*आणि तो पेग मागून पेग... अखेर त्यानेही  मला डच्चू दिला म्हणाला साधू के साथ मै डील नही कर सकता* त्याने आणलेले करोडो रुपये तो परत घेऊन गेला. 

*असो त्या सरदार कॅमेरामन ला मी घरी बसवलं.. पण त्याने इंगा दाखवलाच, आमचं शूटिंग केलेलं सगळं मटेरियल गायब केलं...म्हणे आताच्या आता पैसे टाक. पैसे जमवले पण त्याने अर्धे मटेरियल डिलिट केले माझ्यावर आभाळच  कोसळलं*... मग काय पोलिसात तक्रार केली, भांडलो तंडलो पण काहीच हाथी लागले नाही.

     *आपल्या उतरंड चित्रपटात एक विद्रोही गाणं आहे..* गावात माय लेकींची परेड सुरु असतांना बॅकग्राऊंड मध्ये गाणे वाजते..
*अल्ला का येईना*
*ईश्वर का जागेना*
*वाचविण्या आम्हाला*
 *देव देवी येईना*
या गाण्यात एक ओळ अशी आहे 
*तेहतीस कोटी तुम्ही सगळे खोटे नाटेच आहे ना !*
सर्व रेकॉर्डिंग झाले 

     गायिका हर्षदाने खूप छान प्रकारे गाणे गायले पण तिचा नवरा म्हणाला गाणे काढून टाका, त्यांनी खूप खूप त्रागा केला. पण आम्ही ठाम राहिलो अखेर बोलला ही ओळ बदला...

  *तेहतीस कोटी तुम्ही सगळे खोटे नाटेच आहे ना !* तो म्हणे हे ऐकून लोक आम्हाला जोड्याने मारतील हो.
*म्हटलो काहीही झाले तरी बदलणार नाही. बदलायचे असेल तर 33 कोटी मधल्या एकाला तरी आमच्याकडे घेऊन या !*

 तो चिडीचूप झाला अखेर बोलला निदान आमचे नाव तरी देऊ नका ! म्हटलो ok.
  
      *पुन्हा शूटिंग ला सुरुवात केली. आणि आम्ही शूटिंग करत असलेल्या जीर्ण घरात एक मोठा नाग येऊन भिंतीत ल्या बिळात घुसून बसला. त्याचा अड्डाच असावा तो.. त्याने वर्ष भर आमची शूटिंग पाहत होता..त्या घराला 1760 भोकं होती. भैय्यालाल चे घर देखील असेच फक्त दगडावर दगड आणि शम्भर भगदाडं व अजीर्ण पिंजर झालेलं होतं.*

   असो नागोबा मुळे शूट बंद पडलं होतं... एका सर्प मित्राला बोलावले त्याने खदा खदा भिंत खोदली मोठं भगदाड पडलं त्यातून त्याने शेपटीला धरून नाग बाहेर काढला म्हणाला जाम विषारी जातीचा आहे हा. गावातल्या जातिवाद्या सारखा!

          *पुढे 5 दिवस बरेचसे शूट झाले आणि एम पी हून आलेली पोरगी अर्धनग्न धिंड निघालेले दृश्य चित्रित करण्याच्या आधल्या रात्रीच निघून गेली*
  *पुन्हा मनस्ताप...*

डोक्यावर चार पाचच केस काळे होते ते देखील रातोरात ढवळे झाले असतील.
     *पुन्हा एक कॉर्डीनेटर एक मुलगी घेऊन आला.. या वेळी मात्र पोरगी बाबांची बुध्दाची अनुयायी निघाली. तिने म्हणजे संगीता गायकवाड ने इतके समरसून काम केले कि बस.. तिने आणि प्रवरा ने सिनेमाला एक मोठी उंची प्राप्त करून दिली.*

      सिनेमांत सुरेखा भोतमांगेचा रोल करणाऱ्या पुण्याच्या प्रवरा कुलकर्णी फार पूर्वीपासून आंबेडकरी चळवळीतच होत्या 

त्यामुळे तिने सुरेखा ची विद्रोही भूमिका खूप तन्मयतेनं साकारली!
   *अगदी सुरुवातीला शूटिंग सुरु असताना आमची costume designer रात्री तापाने फणफणली एक असिस्टंट  म्हणाला मला तिच्या रूम मध्येच राहू द्या.. त्याने लई त्रास दिला खूप शिव्या दिल्या.. पण नियम म्हणजे नियम.* आम्ही त्याला हॉटेल बाहेरच ठेवले सांगितले तुझ्यापेक्षा जास्त काळजी आम्ही घेऊ कारण ते  आमचं कर्तव्यच आहे!

 *असो सिनेमाची शूटिंग पुरी झाली.*
     प्रत्येक वेळेस पैशांची प्रचंड टंचाई यायची.. मी वर्कशॉप घ्यायचो लोकांना शिकवून पैसे उभारायचो आणि शूटिंग करायचो.. 

*एक दिवस email वरून कळाले कि एक व्यक्ती मोठा  फिनान्सर आहे. फॉरेन वरुन आलेले पैसे त्याला गुंतवायचे म्हणाला. मी संपर्क साधला त्याने मला पुण्याला बोलावलं Westin हॉटेल जवळ. त्याला 2 लाख दलाली द्यायची कबुली होती..* होतं नव्हतं सगळं विकलं माझ्या काही पेंटिंग देखील विकल्या. आणि 2 लाख घेऊन पोहोचलो त्याचं नाव होतं जावेद. 

*त्याने आमच्यासाठी होटेल बुक केले. म्हणे पहले दलाली दो, मी दिले ! तो बोलला तुझ्या मित्राला इथेच थांबव तू गाडी घेऊन चल. मी टाटा सफारी चालवत असताना त्याने मला रिव्हॉल्व्हर दाखवली. आणि हसला  म्हणाला रखनी पडती है पास एक नही दो दो है!..* 

         तो मला एका वस्तीत घेऊन गेला, म्हणाला थांब मी दहा मिनिटात येतो.. एक तास झाला,  दोन तास, तीन तास झाले जावेद भाऊ आलाच नाही. 

     *मी खूप उद्विग्न झालो.. कारण फसविले गेल्याची भावना फार जिव्हारी लागत असते... मी शांत डोक्याने विचार केला आणि गाडीतच आनापान सुरू केले....आणि मनाशी म्हटलो कूछ भी हो picture to बनेगा ही !* कारण ती समाजाच्या आणि आता माझ्याही अस्तित्वाची लढाई बनली होती!
      *एकदा पैशाच्याच चनचणी मध्ये गाडी विकायला गॅरेज घेऊन गेलो सायंकाळी आठची वेळ, गाडी दिली...चोहीकडे  अंधार होता..* फोनवर बोलत घरी निघालो आणि बोलता बोलता चक्क फुटपाथवरून गटाराच्या मेन होल मध्ये पडलो 12 फूट खाली.. *म्हटलो आता मी मरणार.. तशा रक्तबंबाळ अवस्थेतही मी आनापान सुरु केले.* ग्यारेज वाल्यांनी मोठ्या  मुश्किलीने मला बाहेर काढलं. बोरिवलीच्या भगवती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. सगळीकडे  छातीला पाठीला ढुंगणाला लोखंडी सळया.. लागल्या होत्या बस! हार्ट शाबूत राहिले.
    *शूटिंग तर संपलं आता पुढे एडिटिंग dubing आणि म्युझिकचे प्रमोशनचे काय करायचे... कमीत कमी 25 लाख रुपये हवे होते..*

      एक दिवस पुण्याच्या शरद जाधव साहेबांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि मला फोन केला.. 
म्हणे *पुण्यात पिंपरी चिंचवड ला या... मला बोलावून त्यांनी आणि वसंत साळवी साहेबांनी चक्क माझ्या हाथात 2/2 लाख रुपये ठेवले आणि काम सुरु झाले.. Advocate कैलास जाधव, महेंद्र जाधव, शैलजा ब्राह्मने, सी के जारुंदे जीवनशेठ खरावी, प्रताप सोनावणे, विकास माळी, अनिल मोहिते, नालंदाताई निळे, अशा अनेक दानशूर मान्यवरांनी सिनेमाला मोठा हातभार लावला आहे त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन..त्यानंतर भूषण बोराडे सरां बद्दल काय सांगू त्यांनी निस्वार्थी पणाने होतं नव्हतं ते सर्वच या चळवळीत ओतले आणि सर्वच सुरळीत पार पडले.

   *एका इंटरव्यू मध्ये नुकताच खूप हिट झालेला मराठी डायरेक्टर  म्हणाला होता ज्याच्याकडे पैसे नाही त्याने सिनेमाच करू नये !*

मी तर म्हणेल इच्छा असेल आणि जिद्द असेल तर बिनधास्त सुरु करावा, मार्ग निघत जातो.
 नकारात्मक विचारांनी आयुष्यात काहीच शक्य होतं नाही.
 *एकतर या क्षेत्रात आपली माणसेच नाहीत, आहेत ती सर्व फक्त बांडगुळे, नाव बदलून राहणारी, गणपती बसवणारी.* देव देव्या पुजणारी आपल्या माणसांना दूर ठेवणारी ओळख न दाखवणारी.
*तुम्हाला सांगतो बुध्दा सारखा सकारात्मक विचार विकसित करणारा मार्ग जगात दुसरा नाही* विपश्यना आनापान वैयक्तिक सकारात्मक ऊर्जा वाढवते. याचा मला अनुभव आहे बाकी विपश्यनाचा संबंध चळवळीशी जोडणे विसंगत आहे.

     *बंधूंनो सिनेमा क्षेत्रात पुढे या हे क्षेत्र काबीज करा.. त्यामुळे आपले कलाकार तयार होतील त्यांना रोजगार मिळेल, आपल्या समाजाच्या व्यथा, अस्सल कथा जगापुढे येतील घरोघरी  फुले शाहू आंबेडकर बुध्द  पोहोचतील.* आज आपण  स्वतंत्र आंबेडकरी चित्रपट निर्मिती आणि वितरण व्यवस्था उभी केली आहे.
Aim2 नावाची म्हणजे *(आंबेडकराइट इंटरनॅशनल मीडिया अँड मुव्हमेंटस)*
अजूनही खूप अडचणीना तोंड देतोय सांगेन कधी तरी. *पण हार कधी मानायची एव्हढं बाबांनी मेंदूत पक्क जिरवलंय पिकवलंय!*

    लेख आवडला तर फोन करा!

आपला *उतरंड* हा झंझावती  चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे! देश विदेशात पोहोचलाय.. 
*कृपया नेटवरून बघा आणि तिकीट रुपी धम्मदान करून आपली माणसे आपले कलावंत जगवा!* चित्रपटाची लिंक मिळविण्या साठी फोन करा!

 आपला *सुदाम वाघमारे -लेखक दिग्दर्शक* 9833777250 / 9820208028

Bottom Ad [Post Page]