Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]


मुंबई स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांची रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र या लढतीत अक्षयच्या 'गोल्ड'ने जॉनच्या 'सत्यमेव जयते'ला धोबीपछाड केलं. गोल्डने पहिल्या दिवशी 25.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 

भारताने मिळवलेल्या पहिल्या सांघिक सुवर्णपदकाची कथा सांगणाऱ्या 'गोल्ड' चित्रपटाला पहिल्याच दिवशी म्हणजे स्वातंत्र्यदिनी तूफान प्रतिसाद मिळाला. गोल्डने पहिल्या दिवशी तब्बल 25 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली. जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते'ने पहिल्या दिवशी 20 कोटी 52 लाख रुपयांचा गल्ला कमवला.

 'गोल्ड' हा वर्षभरातला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला संजय दत्तचा बायोपिक 'संजू' (34.75 कोटी) हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर सलमान खानचा 'रेस 3' (29.17 कोटी) हा चित्रपट सर्वाधिक ओपनिंगच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे 'सत्यमेव जयते' या यादीत फार मागे नाही. 2018 मध्ये सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या सिनेमांमध्ये टायगर श्रॉफचा 'बागी 2' (25.10 कोटी) चौथ्या, तर 'सत्यमेव जयते' (20.52 कोटी) पाचव्या क्रमांकावर आहे. 

सत्यमेव जयते हा सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळवूनही सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. हा जॉन अब्राहमचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

from movies 

Bottom Ad [Post Page]