Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1

चित्रपट करताना हा विचार करावा 
                         
1)आपण जी स्टोरी निवडली आहे ती नक्की मार्केट मध्ये चालेल का?
                        
2)आपण जे कलाकार निवडलेले आहेत ते कथेला सुट होतात का?मग तो हिरो असो किवा हिरोईन असो किवा हिरोईन चे आईवडील असो अन्य कोणत्याही कलाकार असो
      
3) चित्रपट करायचे ठरल्यावर चित्रपटातील कलाकार चे आॅडिशन घ्यावेत जवळचे(नात्यातील) कलाकार घेवू नयेत ज्या कलाकाराना अभिनयाची अवड आहे अशा कलाकारांच घ्यावे नाही तर चित्रपटाच्या शुटिंग चे दिवस वाढतील आणि खर्च वाढले 
    
4) शूटिंगच्या वेळेस सेटवरील लोकाना योग्य तो सन्मान द्यावा मग तो कलाकार असो किवा तंत्रज्ञ असो कोणत्याही कलाकाराने कोणालाही आवाज देताना दादा म्हणून हाक मारावी नाहीतर एखाद्याला (स्पॉटबॉय) ये स्पॉट म्हणुन हाक मारू नये दादा म्हणून हाक मारल्याने समोरच्या व्यक्तीचा पण आदर रहातो आणि  सेटवर तुमचा पण आदर रहातो


5)शूटिंगच्या सेटवर कोणीही भांडु नये आणि लोकेशन वर कचरा करू नये

        
6)शूटिंगच्या सेटवर सगळ्याना जेवण  नाष्टा एक सारखेच असावे कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात भेदभाव करू नये कारण चित्रपटाची सगळी टिम मनापासून काम करत असतात आणि रहाण्याची पण सोय सगळ्याना एक सारखी करावी त्यात पण भेदभाव करू नये कारण चित्रपट क्षेत्रात कोणालाही कमी समजू नये एखादा स्पॉटबॉय दिग्दर्शक किवा निर्माता  बनु शकतो तर फोटो ग्राफर कॅमेरामन बनु शकतो त्यामुळे कोणालाही कोणी कमी समजू नये हे निर्माता व दिग्दर्शकानी लक्षात ठेवले पाहिजे कारण हि चित्रपटाची सगळी या दोघांच्या जबाबदारी वर आलेली असतात जास्त करून दिग्दर्शकाने टिम वर  चांगले लक्ष ठेवले पाहिजे तुमच्या चित्रपटाचे काम चांगलेच होत असते फक्त तुम्ही माणस जपली पाहिजेत नाही तर माणसांना जपले नाही तर कामावर परिणाम  होऊ शकतो त्यामुळे चित्रपटाचे दिवस वाढु शकतात शुटिंगचा खर्च पण वाढतो मग चित्रपटाचे शुटिंग बंद पडण्याची शक्यता असते 

धन्यवाद 

Bottom Ad [Post Page]